भारतीय इंटरनेट बाजारपेठेत एम ब्लेझ पॉवर वाय-फाय

wifi
भारतीय इंटरनेट बाजारपेठेत अलीकडेच एम टी एस इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीने एम टी एस ब्लेझ पॉवर वाय-फाय डेटा कनेक्टीव्हीटी डिव्हाईस दाखल केले आहे. यामध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवेबरोबर स्मार्टफोन व टॅबलेट सारखे डिव्हाईस चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. व यामुळे हायस्पीड इंटरनेट सेवेबरोबर बॅटरी चार्जींगची सोय मिळते.

5200 एमएएच ची बॅटरी एम ब्लेझ पॉवर डिव्हाईसमध्ये बसविण्यात आली असून याच्याद्वारे 3 वेळा स्मार्टफोन रिचार्ज करु शकतो. तसेच एकाच वेळी या डिव्हाईसद्वारे लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही, गेमींग कन्सोल यासारख्या 6 विविध डीव्हाईसना वायफाय द्वारे हायस्पीड इंटरनेटचा पुरवठा करु शकतो.

या डिव्हाईसमध्ये मिडीया शेअरींगची सोय करण्यात आली असून यामध्ये बसविण्यात आलेल्या 32 जीबी मेमरी कार्डमध्ये स्टोअर केलेली व्हिडीओज, गाणी, ऑफीशीयल डेटा, फोटोज, आपण इतरांना शेअर करु शकतो.

एम ब्लेझ पॉवर वायफाय सर्व्हिस प्रिपेड स्किममध्ये रु. 3499 व पोस्टपेड स्किममध्ये 2999 मध्ये विविध आकर्षक सवलतीसह ग्राहकाना उपलब्ध करण्यात येत आहे. हे डिव्हाईस एमटीएसच्या सर्व रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.

गॅजेटप्रेमीसाठी जे सतत प्रवासामध्ये असतात त्यांच्यासाठी हे डिव्हाईस खूपच उपयोगी आहे.

Leave a Comment