फिलिपिन्सवर घोंघावतेय ‘रामसन’ चक्रीवादळ

cyclone
मनिला : फिलिपिन्सवर घोंघावणार्‍या ‘रामसन’ चक्रीवादळामुळे किनारी प्रदेशातील हजारो नागरिकांनी घरदार सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घेतला आहे. खवळलेला समुद्र आणि सोसाट्याचा वारा यामुळे छोट्या-मोठय़ा वादळांचे भयंकर चक्रीवादळात रूपांतर झाले असून, फिलिपिन्सला यंदाच्या पावसाळी मोसमातील हे पहिले चक्रीवादळ देशाच्या किनारपट्टीजवळ येऊन धडकले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ‘रामसन’ देशातील बहुतेक मोठय़ा शहरांपर्यंत पोहोचेल. फिलिपिन्सच्या पूर्व किनार्‍यावर असलेल्या बिकोल या ५४ लाख लोकवस्तीच्या शहरातून ६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असून, वादळ धडकण्यापूर्वी ३९ हजार नागरिकांना हलविण्यात येणार असल्याचे शहराचे नागरी संरक्षण दलाचे प्रमुख रफेलिटो यांनी सांगितले. वादळाचा धोका लक्षात घेऊन मनिलामधील सर्व सरकारी कार्यालये, शाळांना बंद करण्यात आले आहे. हवाई वाहतूक सेवेवरही ‘रामसन’चा परिणाम झाला असून, अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. किनारी भागातील सर्वच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या निवार्‍याची तसेच अन्नपाण्याची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे राहिले आहे.

Leave a Comment