‘त्या’ दोघींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश!

facebook
पालघर: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून पोलिसांनी डांबून ठेवलेल्या दोन युवतींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

पालघरच्या या दोन तरूणींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या कारणावरून पोलिसांनी दोन युवतींना डांबून ठेवले होते. याप्रकरणी दोन्ही तरूणींना प्रत्येकी 50 हजार रूपये भरपाई देण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.

या मुलींना डांबून ठेवणे म्हणजे भाषण स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. एवढंच नव्हे तर या तरूणींना नुकसानभरपाई दिल्याचे पुरावे 4 आठवड्यात सादर करा, असेही आयोगाने बजावले आहे.