गळलेले २६ लाख मतदार पुन्हा यादीत येणार

election
मुंबई – लोकसभेच्या निवडणुकांत महाराष्ट्रात सुमारे २६ लाख मतदारांची नांवे मतदार याद्यांतून गायब झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. या गळलेल्या सर्व मतदारांची नांवे विधानसभेच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त संपथ यांनी सांगितले. या सर्व मतदारांना स्पीड पोस्टाने त्यांच्या पत्त्यावर फॉर्म ६ पाठविला जाणार असून त्या संदर्भात पोस्ट मास्तर जनरल यांच्याशी चर्चाही झाल्याचे संपथ यांनी सांगितले.

आक्टोबरमध्ये राज्यात होत असलेल्या विधानसभांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दोन दिवसांच्या दौर्‍यावर राज्यात आले होते. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. या काळात येत असलेल्या परिक्षा आणि सणांच्या तारखा लक्षात घेऊन मतदानाचा तारखा निश्चित केल्या जातील असे संपथ यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे पेड न्यूजवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले असून लक्ष ठेवण्यासाठी कमेट्या स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगितले. मतदार यांदीत मतदानाच्या तारखेपर्यंत नांवे नोंदविली जाणार आहेत. सध्या नांवे नोंदविण्यासाठी १९ लाक ३१ हजार अर्ज आले असल्याचेही संपथ म्हणाले.

Leave a Comment