एम.व्ही. प्रियंकामधून तेलगळती झाल्यास समुद्रकिनारा दूषित होण्याची भीती

mv-priyanka
रायगड : मागील दोन दिवसांपासून रायगडच्या समुद्रात उसळत्या लाटा आणि जोरदार वाहणारा वाऱ्यामुळे अडकलेल्या एम. व्ही. प्रियंका जहाजामधून तेलगळती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगडचा समुद्रकिनारा तेलगळती झाल्यास दूषित होऊ शकतो.

मुबंईहून रेवदंडय़ांकडे एम. व्ही. प्रियंका लोखंडी प्लेट घेऊन जात असून, या प्लेटांचे वजन जवळपास १९०० टन आहे. जहाजाची रुंदी ७० मीटरच्या आसपास आहे. दरम्यान, जहाजावरील सर्व १६ कर्मचाऱयांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, दोन दिवसांपासून समुद्रात बुडण्याच्या मार्गावर असणारे जहाज बाहेर काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे दिसून येते. कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर्स जहाजातून तेलगळती तर होत नाही ना… याची पाहणी करत असून, जहाजामधून अद्याप तेलगळतीला सुरूवात झालेली नाही.

Leave a Comment