उद्योग मंत्र्यांनी मुलाच्या नादात लुगडे गमावले – प्रमोद जठार

combo
सिंधुदुर्ग : भाजप आमदार प्रमोद जठार यांनी काँग्रेस नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे दगडफेक प्रकरणावर चिमटा काढत, ‘धोतराच्या धंद्यात कमावले आणि मुलाच्या नादात लुगडे गमावले’ अशा शब्दांत जठार यांनी राणेंना टोला लगावला आहे.

काळ कुठे जात आहे. याचे भान राणे यांनी ठेवले पाहिजे. ज्यांचे स्वागत आधी फुलांनी व्हायचे त्यांचे स्वागत आता दगडांनी होते आहे, अशा शब्दात जठार यांनी राणेंना चिमटा काढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी नितेश राणे यांच्या वाहनावर काही जणांना दगडफेक केली होती. याप्रकरणी नितेश राणेंनी ओरोस पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

दगडफेकीत एक जण जखमीही झाला होता. नितेश राणे मालवणला जात असताना ओरोस रानबांबुळी गावा दरम्यान ही घटना घडली होती. राणेंच्या बालेकिल्लातच राणे पुत्रावर दगडफेक होते आहे, त्यामुळे या घटनेवरुनही राणेंना टोला लगावण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे.

Leave a Comment