अफगाणिस्तानात कार बॉम्ब स्फोटात ९० ठार

afganistan
काबूल- अफगाणिस्तानात पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांच्या घटनात वाढ झाली आहे. अफगाणिस्तानाच्या पूर्व भागात मंगळवारी बाजाराच्या ठिकाणी झालेल्या कार बॉम्बस्फोटात किमान ९० ठार झाले असून ४० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी ही स्फोटके भरलेली कार उभी केली गेली होती आणि ऐन गर्दीच्या वेळीच त्याचा स्फोट झाला असे पोलिस अधिकारी निसार अहमद अब्दुल रहीमजाई यांनी सांगितले. कारचा स्फोट इतका जोरदार होता की त्यामुळे आसपासची अनेक दुकाने उध्वस्त झाली. या ढिगार्‍यांखालीही कांही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

काबूलमध्ये रस्त्याकडेला राष्ट्रपती करजाई याच्या मिडीया कार्यालयाजवळ झालेल्या दुसर्‍या स्फोटात दोन कर्मचारी ठार तर ५ कर्मचारी जखमी झाले असल्याचेही समजते. या स्फोटांची जबाबदारी तालिबान संघटनेने घेतली आहे.

Leave a Comment