स्वीडीश टेनिस स्पर्धेत पॅव्हेलचेंकोव्हा पराभूत

min
बॅस्टेड – अमेरिकेच्या ग्रेस मिनने द्वितीय मानांकित रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाचा स्वीडनमध्ये चालू असलेल्या स्वीडीश खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव केला. मिनने हा सामना ६-०, ६-४ असा जिंकून विजयी सलामी दिली.

पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात स्लोव्हाकियाच्या सिपेलोव्हाने वाईल्ड कार्ड मिळालेल्या रिबेका पीटरसनचा ६-४, ६-४ तसेच द. आफ्रिकेच्या स्कीपेर्सने कोलंबियाच्या मारिनोचा ६-३, ६-४ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. रुमानियाच्या बेगुला दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागल्याने स्पेनच्या अरुबेरेनाला पुढे चाल मिळाली.

Leave a Comment