स्टेट बँकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

sbi
मुंबई : मुदत ठेवींवरील व्याज दरात भारतीय स्टेट बँकेकडून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सात ते 179 दिवसांपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात करण्यात येणार आहे.

ही कपात येत्या शुक्रवारपासून (दि.18) लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी सात ते 179 दिवसांसाठी 7.5 टक्के व्याजदर मिळत होता. त्यामुळे ठेवीदारांना अर्ध्या टक्क्यांच नुकसान सहन कराव लागणार आहे. येत्या काही दिवसांत इतर बँकाही ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment