विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मेळावे

congress
मुंबई – काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय स्तरावर कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. औरंगाबाद (२२ जुलै), नागपूर (२४ जुलै) आणि पुणे (२५ जुलै) येथे हे मेळावे आयोजित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्याला विभागातील लोकसभा-विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील काँग्रेसचे विजयी व पराभूत उमेदवार, प्रदेश-जिल्हा-तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, सहकार चळवळीतील नेते व प्रमुख सहकारी संस्थांचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल, एनएसयूआय आणि काँग्रेसच्या विविध सेल व विभागांचे जिल्हा-ब्लॉक पदाधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment