कोलकाता: टीम इंडियाचा आणखी एक बॅचलर ऑफिशिअली एंगेज झाला आहे. रविंद्र जडेजाने साखरपुडा केला असून या बातमीमुळे त्याच्या तमाम महिला चाहत्यांचा हिरमोड होईल.
रविंद्र जडेजाने केला गुपचूप साखरपुडा
चेतना नावाच्या या मैत्रिणीबरोबर जडेजाचा साखरपुडा झाला असून काही दिवसांपूर्वी जडेजा जयपूरमध्ये एका अनोळखी मुलीबरोबर टीम बसमध्ये आढळला होता. ती मुलगी म्हणजेच चेतना.
मिळालेल्या माहितीनुसार ती त्याची नियोजित वधू चेतना आहे. जडेजाला वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी उपलब्ध असेल.