बी.रामलिंग राजू वर १४ वर्षे बंदी

raju
देशातील सर्वात मोठा कार्पोरेट घोटाळा म्हणून नोंद झालेल्या सत्यम घोटाळ्याचा तपास सेबीने साडेपाच वर्षांच्या कालावधीनंतर पूर्ण केला आहे. कंपनीचा संस्थापक बी. रामलिंग राजू याला या चौकशीत दोषी ठरविण्यात आले असून त्याच्यासह अन्य ४ जणांवर सेबीने १४ वर्षांसाठी बंदी घातली आहे.यामुळे यापुढची १४ वर्षे राजू आणि त्यांचे अन्य सहकारी शेअर बाजारात कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत. तसेच त्यांनी अवैध मार्गाने कमावलेले १८४९ कोटी रूपये ४५ दिवसांच्या आत सेबीकडे जमा करण्याचे आदेशही दिले गेले आहेत.

राजू आणि त्यांचे अन्य सहकारी बी.रामाराजू, वरदमणी श्रीनिवास, जी रामकृष्ण, व्हीएस प्रभाकर गुप्ता यांनी जाणूनबुजून व स्वार्थापोटी कंपनीत घोटाळा केल्याचा निष्कर्ष सेबीने काढला आहे. हा घोटाळा ७ जानेवारी २००९ रोजी बी. रामलिंग राजू यांनी सेबीला लिहिलेल्या एका पत्रामुळेच उघडकीस आला होता. व त्यानंतर कंपनीची चौकशी सुरू झाली होती. कंपनीत १८४९ कोटी रूपयांचा घोटाळा दिसल्याने ही रक्कम राजू यांनी १२ टक्के व्याजासह सेबीला परत करावयाची आहे. हे व्याज ७ जानेवारी २००९ पासून आकारले जाणार आहे.

कंपनीत घोटाळा झाल्यानंतर टेक महिंद्राने सत्यमचे अधिग्रहण केले असून आता ही कंपनी टेक महिंद्र मध्ये विलीन करण्यात आली आहे.

Leave a Comment