फराहच्या सहभागावर प्रश्नचिन्ह ?

mo
ग्लॅस्गो – ब्रिटनचा अव्वल धावपटू मो फराह या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. बीबीसीच्या नभोवाणीने दुहेरी ऑलिम्पिक आणि विश्व विजेता फराह हा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत फराह ५,००० मी. आणि १०,०००मी. धावण्याच्या शर्यतीत सहभागी होणार होता.लंडन क्रीडा स्पर्धेत येत्या रविवारी तो दोन मैल पल्ल्याच्या शर्यतीत धावणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment