चीनचा ‘ शाओमी मी-3’ मोडणार ‘सॅमसंग’चे कंबरडे ?

mobile
मुंबई : चीनच्या शाओमी कंपनीने भारताच्या स्मार्टफोन मार्केटवर वर्चस्व असणाऱ्या सॅमसंगसाठी एक मोठा धक्का दिला आहे.
शाओमी कंपनीने भारतात पहिला स्मार्टफोन ‘मी-3’ लॉन्च केला आहे. भारतात 22 जुलैपासून हा फोन फ्लिपकार्डच्या माध्यमातून विकला जाणार आहे. सध्या या फोनची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.

शाओमीचे अध्यक्ष बिन लिन यांनी म्हटले आहे की ‘मी-3’ हा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही फोनपेक्षा ३० टक्के अधिक वेगाने काम करतो, आम्ही भारतात पहिल्यांदा सर्वोत्तम फोन घेऊन आलो आहे.

स्नॅपड्रॅगन ऑक्टाकोर प्रोससर आणि दोन जीबी रॅम या फोनमध्ये आहे, तसेच या फोनमध्ये दमदार हार्डवेअर लावण्यात आले आहेत.

‘मी-3’ ची किंमत 13 हजार 999 रूपये ठेवण्यात आली आहे. ‘मी-3’ भारतीय बाजारात 14 हजारापर्यंत येईल, असं सांगण्यात आलं होतं, पण त्याची किंमत आणखी हजार रूपये कमी झाली आहे.

‘फ्लिपकार्ट’चे सीईओ सचिन बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन असा आहे की, यामुळे चीनच्या उत्पादनाकडे लोकांच्या पाहण्याचा दृष्टीकोन निश्चित बदलेल.

Leave a Comment