खाणीतून किती सोने काढले ,आजपर्यंत खुलासाच नाही

gold-mine
इंडोनेशियातील सुदिरमन पर्वतरांगांमध्ये ग्रासबर्ग नावाची एक खाण सोन्याची आहे आणि तीही जगातील सगळ्य़ात मोठी. अर्थात इंडोनेशियामध्ये असली तरी तिचे संचलन अमेरिकेतील फ्रिपोर्ट-मॅक्मोरन नामक खाण कंपनीतर्फे केले जाते. १९७0मध्ये ही कंपनी स्थापन झाली आहे.फ्रिपोर्टने इंडोनेशियन सरकारसोबत केलेल्या करारानुसार, या खाणीचा ९0.६४ टक्के हिस्सा कंपनीचा होता, तर उरलेला सरकारचा ,हे विशेष !

डेन्मार्कमधील विशेषज्ञ जीन जेकस डोजी यांच्या माहितीनुसार, ही जागा सोने व तांब्याच्या खनिजांनी भरलेली आहे. या खाणीतून किती सोने काढले जाते त्याच्या प्रमाणाचा आजवर कधीच खुलासा केला गेलेला नाही. ही जागा बरीच वादग्रस्तही राहिली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या खाणीत ज्याप्रकारे खोदकाम करण्यात आले, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय स्थानिक लोकांनी तिथे सैनिक तैनात करण्यात विरोध दर्शविला आहे. हे वाद मिटविण्यासाठी फ्रिपोर्टने पापुआ क्षेत्रातील लोकांसाठी बाजारपेठांची स्थापना, घरांची बांधणी यांसारखी विविध विकासकामे केली. खाणीचा इतिहास, तंत्रज्ञान व तिच्या प्रभावाबाबत जाणून घेण्याच्या उद्देशाने सध्या तिथे पर्यटनांना जाण्याची मुभा दिली जात आहे.

Leave a Comment