संगणक दुरुस्ती आणि विक्रीत तेजी

computer
नवी दिल्ली – संगणकच्या विक्रीत काही दिवसांपासून असणारी सुस्ती कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उत्तर अमेरिका आणि युरोप यासारख्या विकसित बाजारांमध्ये मागणीमध्ये सुधारणा आल्याने एप्रिल ते जून या दरम्यान पीसी मार्केटमध्ये चांगला उत्साह दिसून येत आहे. परंतु, आताही टॅबलेट कॉम्प्युटर मार्केटमध्ये अग्रस्थानी आहेत.

मुख्य म्हणजे मागील काही वर्षात टॅबलेट्स आणि मोबाईल डिवाईसेसची मागणी वाढल्याने पीसीच्या विक्रीत मोठी घसरण झाली. अमेरिका आणि युरोपातील अर्थव्यवस्था मंदावल्याचा परिणाम पीसी मार्केटवर पडला आहे. रिसर्च फर्म `इंटरनॅशनल डाटा कॉर्प’ आणि गार्टनर इंक यांच्या मतानुसार जागतिक मंदी संपुष्टात येण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.

मात्र गार्टनरच्या मतानुसार 2015 मध्ये टॅबलेट कॉम्प्युरची विक्री पीसीच्या पुढे जाणार आहे. पुढील वर्षी पीसीची जागतिक स्तरावरील विक्री 31.6 युनिट राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान, टॅबलेटची विक्री 32 कोटी युनिट राहण्याची शक्यता आहे.

आयडीसीच्या मतानुसार एप्रिल ते जूनच्या दरम्यान पीसी विक्री 1.7 टक्क्यांनी घसरून 7.44 कोटी युनिट राहिली तर मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री 7.1 टक्क्यांनी घसरली होती. गार्टनरच्या मते चालू दरम्यानच्या काळात पीसी विक्री 0.1 टक्क्यांनी वाढली आहे. आयडीसीचे उपाध्यक्ष लॉरेन लोवर्डे म्हणाले, की मागील वर्षी कमी मागण्यांच्या कारणाने आणि शॉर्टटाईम रिप्लेसमेंट इक्विटीमुळे पीसीच्या विक्रीत सुधारणा दिसून आली होती.

Leave a Comment