मधुमेहींचा योग्य आहार

diet
मधुमेह जडलेल्या व्यक्तीला निरामय जीवन जगायचे असेल तर मधुमेहींसाठी डॉक्टरांनी नेमून दिलेलाच आहार घेणे आणि त्या आहाराच्या बाबतीतली पथ्ये कसोशीने पाळणे हा एकमेव उपाय असतो. डॉक्टर मंडळी वारंवार ही पथ्ये आणि हा आहार सांगत असतात. ब्लड शुगरची पातळी योग्य राहील असाच हा आहार असतो. असे काही आहार खाली देत आहे.

१) मधुमेही व्यक्तीने स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ कमी असणार्‍या भाज्या प्राधान्याने खाल्ल्या पाहिजेत. त्यात प्रामुख्याने पालक आणि मोड आलेली हिरवी कडधान्ये यांचा समावेश होतो. हे मोड आलेले कडधान्य आहारात मिसळून खाणे जास्त श्रेयस्कर असते.

२) स्ट्रॉबेरी हे फळ मधुमेहींसाठी सर्वात उत्तम मानावे लागेल. कारण त्यामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असतात आणि पाण्याचे प्रमाण खूप असते. या फळात गोडी भरपूर असली तरी कॅलरीज्चे प्रमाण कमी असते आणि कर्बोदकेही मर्यादित असतात. तेव्हा ब्रेकफास्टच्या वेळी चार स्ट्रॉबेरीज् खाल्ल्या तरी लगेच काही शुगर वाढत नाही.

३) मधुमेही व्यक्ती चरबीचे प्रमाण कमी असणारे मांसाहरी पदार्थ खाऊ शकतात. उदा. मासे आणि चिकन. मांसाहार करताना मधुमेही व्यक्तीने प्राण्यांच्या शरीराचे विशेष भाग आवर्जून मागितले पाहिजेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment