
बुचारेस्ट – द्वितीय मानांकित रॉबर्टा व्हिन्सीचे आव्हान रोमानियाच्या अग्रमानांकित सिमोना हॅलेपने ६-१, ६-३ असे सहजपणे संपुष्टात आणत येथे झालेल्या बुचारेस्ट ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
बुचारेस्ट ओपन टेनिस स्पर्धेत हॅलेप अजिंक्य
प्रारंभापासूनच जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानावर असणाऱया हॅलेपने सातत्यपूर्ण खेळ करीत पहिला सेट आरामात जिंकला. ३१ वर्षीय व्हिन्सीने दुसऱया सेटमध्ये आपली सर्व्हिस गमविल्यानंतर ती ४-२ असे मागे पडली. हॅलेपने शेवटचा गेम एकतर्फी जिंकत ७० मिनिटांत सामना संपवला. हॅलेपने आतापर्यंतच्या पाच लढतीत व्हिन्सीवर ३-२ अशी आघाडी घेतली आहे. २२ वर्षीय हॅलेप या वर्षी फॉर्मात असून तिने प्रेंच स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले तर विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
