नागपंचमीला सापांच्या खेळावर बंदी

nagpanchami
सांगली : उच्च न्यायालयाने आज नागपंचमीला केल्या जाणाऱया सापांच्या खेळावर बंदी घातली आहे. या संदर्भात 2002 साली निसर्गप्रेमींनी सांगली जिल्हय़ातील शिराळा गावात केल्या जाणाऱया सापाच्या खेळावर बंदी घालावी, या मागणीसाठी याचिका दाखल केली होती.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या अखत्यारित एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी नागपंचमीदिवशी सापाचे खेळ केले जातात. यासाठी निसर्गप्रेमी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयाने शिराळा ग्रामस्थ दुखावले असून, सापांचे खेळ ही धार्मिक बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या निर्णयावर शिराळावासीय पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत.

Leave a Comment