धोनीने केले भारतीय गोलंदाजांचे कौतुक

dhoni
नॉटिंगहॅम – यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी अनिर्णीत राहिली. भारतीय गोलंदाजांनी नॉटिंगहॅमच्या पाटा खेळपट्टीवर चांगली कामगिरी केल्याची प्रतिक्रिया कर्णधार धोनीने पत्रकारांशी बोलताना दिली.

गोलंदाजीला नॉटिंगहॅमची खेळपट्टी फारशी साथ देत नव्हती. त्या स्थितीत भारताने पहिल्या डावात ४५७ तर दुसऱया डावात ९ बाद ३९१ धावा जमविल्या. यजमान इंग्लंडने पहिल्या डावात ४९६ धावा जमविल्या. ही खेळपट्टी शेवटच्या दिवसापर्यंत फलंदाजीस अनुकूल असल्याने आम्ही या खेळपट्टीवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. पण भारतीय गोलंदाजांनी अशा पाटा खेळपट्टीवर १६० षटके टाकली. भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने २५ ते ३५ दरम्यान षटके टाकली. भारताची फलंदाजी अधिक समाधानकारक झाल्याचे धोनीने सांगितले. मुरली विजयच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. तर निर्जिव खेळपट्टीवर गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही दोन अर्धशतके झळकविली. स्टुअर्ट बिन्नी, मोहम्मद शमी आणि इंग्लंडच्या ऍन्डरसनने कसोटीतील आपले पहिले अर्धशतक झळकविले. या मालिकेतील उर्वरित सामन्यात आम्हाला सजीव खेळपट्टय़ा पहावयास मिळतील अशी आशा धोनीने व्यक्त केली आहे. इंग्लंडमधील विविध खेळपट्टय़ा स्विंग गोलंदाजीला अनुकूल असतात याचा प्रत्यय नॉटिंगहॅममध्ये पहावयास मिळाला असेही त्याने सांगितले.

Leave a Comment