दिवाळीपर्यंत चांदी होणार 50 हजारी!

silver
मुबंई – चांदीच्या किमतीत सलग सहाव्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय बाजारात वृध्दी झालेली दिसून आली. चांदीच्या किमतीत अशाप्रकारची तेजी 2011 नंतर प्रथमच दिसून आली. भारतीय बाजारातील जाणकार सोन्याच्या तुलनेत चांदीला गुंतवणुकीच्या दृष्टीतून महत्त्वपूर्ण मानत आहेत. जाणकारांच्या मते, दिवाळीपर्यंत चांदी भाव 50 हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तर टेक्नॉलॉजी चार्ट्स चांदी भाव 60 हजार रुपये प्रति किलो होण्याचे दर्शवित आहेत.

सध्या कॉमेक्सवर चांदी 36 सेंटच्या घसरणीवरुन 21.42 डॉलर प्रति औंस स्तरावर कारभार करीत आहे. देशी वायदा बाजारात सोमवारी 45,162 रुपये प्रति किलो स्तरावर होती.

केडिया कमोडिटीचे प्रमुख अजय केडिया यांच्या मतानुसार, चांदीच्या दरात पुढील येत्या दिवसात चांगली तेजी येण्याची शक्यता आहे. कारण, चांदीने बऱयाच दिवसांनंतर 40 हजारचा स्तर सोडला आहे. तसेच चांदीच्या तेजीचे मुख्य कारण चीन आणि जपान या देशांच्या अर्थव्यवस्थेत पुन्हा उत्साह दिसून आला आहे. जागतिक स्तरावर चीन सर्वात जास्त बेस मेटलचा वापर करतो.

Leave a Comment