चीनची कैलास मानसरोवर यात्रेसाठी रस्ता देण्याची तयारी

modi
ब्राझील : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर कैलास मानसरोवर यात्रेसाठी आणखी एक नवा मार्ग तयार करणे यासह इतर अनेक उपयुक्त प्रस्ताव ठेवले आहेत.

आजपासून सुरू होत असलेल्या सहाव्या शिखर संमेलनापूर्वी शी जिनपिंग आणि मोदी यांची भेट झाली. त्यावेळी हा प्रस्ताव ठेवण्यात आला. चीन भारतासोबतचे व्यापार संबंध सुधारण्याठी प्रयत्नशील राहणार आहे. भारताने शांघाई संघटना एससीओमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावावी, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.

सुमारे 80 मिनिटे झालेल्या भेटीत शी जिनपिंग आणि मोदी यांच्यात दोन्ही देशातील व्यापार, पर्यटन, सीमाप्रश्न, दहशतवाद यासह विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी शी जिनपिंग यांनी मोदी यांना येत्या नोव्हेंबरमध्ये चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर या वर्षाअखेर पर्यंत शी जिनपिंग हे देखील भारत भेटीवर येणार आहेत.

Leave a Comment