काश्मीर मुक्तीसाठी जिहादी गटांनी एकत्र यावे- सैय्यद सलाहुद्दीन

kashmir
पाकिस्तानमधील १६ दहशतवादी गटांच्या युनायटेड जिहादी कौन्सिलचा अध्यक्ष सैय्यद सलाहुद्दीन याने सिरीया आणि इराकप्रमाणेच काश्मीरसाठी जागतिक जिहाद पुकारल्याचे जाहीर केले असून तालिबान्यांसह जगातील सर्व जिहादी संघटनांनी काश्मीरमुक्तीसाठी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. मुजफ्फराबाद येथे पार पडलेल्या शहीद दिवसाच्या कार्यक्रमात तो बोलत होता. हा दिवस १९३१ मध्ये डोग्रा शासन कालात झालेल्या २० मुस्लीमांच्या हत्येच्या स्मरणार्थ पाक व्याप्त काश्मीरमध्ये साजरा केला जातो.

यावेळी बोलताना सलाहुद्दीन याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवू नयेत असा इशारा दिला असून शरीफ यांनी पाठविलेली पत्रे आणि साड्यांमुळे काश्मीरी जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप केला आहे. भारतीय सेनेकडून काश्मीरी जनतेवर अत्याचारांचे सत्र सुरू आहे. यामुळे जगातील सर्व जिहादी संघटनांनी काश्मीर मुक्तीसाठी आमच्या मदतीला यावे त्यांचे आम्ही स्वागत करू असेही आवाहन केले आहे.

Leave a Comment