इस्त्रायलकडून गाझा पट्टीत युध्दविराम

gaza
जेरुसलेम – गाझा पट्टीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला हिंसाचार थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्त्रायलच्या सुरक्षा समितीने इजिप्तच्या मध्यस्थीने आलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासून इस्त्रायलने गाझा पट्टीवरील हल्ले थांबवले आहेत. मात्र हमासने इस्त्रायलच्या अँशकेलॉन शहरावर तीन रॉकेट डागून हा युध्दविराम मंजूर नसल्याचे संकेत दिले आहेत.

हमासने डागलेली तीनही रॉकेटस मोकळया जागेत पडली यामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नाही असे लष्कराने सांगितले. गेल्या आठवडयाभरापासून इस्त्रायलने गाझा पट्टीवर जोरदार हल्ले केले. यामध्ये दीडशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला.

Leave a Comment