मुंबई : सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाल्यानंतर सोने दरातही घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोने 280 रुपयांनी घसरल्याने सोने बाजारात सोने स्वस्त झाले. सोमवारी सोने प्रति तोळा 28,450 रुपये इतका भाव होता.
सोनेही झाले स्वस्त
औद्योगिक युनिट आणि नाणे बाजारात सोनेची मागणी कमी झाली होती. तर चांदीमध्ये 400 रुपयांनी घट होऊन चांदीचा किलोला दर 45600 रुपये इतका होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चार महिन्यातील अंच्चांकावरून खाली आले आहे. याचा परिणाम सोने किंमतीवर दिसून येत आहे. सिंगापूरमध्ये सोने किंमतीत 1.6 टक्केने घट झाली. 1317.12 आणि चांदीचा भाव 1.6 टक्के घसरून 21.09 डॉलर प्रति औंस राहला.
दिल्लीत सोने 99.9 आणि शुद्ध सोनेचा 99.5 भाव होता. 280 रुपयांची घर सोने बाजारात दिसून आली. दिल्लीत सोने 28250 ते 28450 दरम्यान प्रती तोळा दर होता. तर चांदीमध्ये 400 रुपयांनी घसरण दिसून आली. चांदी 45600 प्रति किलो दर होता.