शक्ती मिल प्रकरण; दोन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी

shkati
मुंबई : आज बाल न्यायालयाने शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोन्ही अल्पवयीन आरोपींना दोषी ठरविले असून हे आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना 3 वर्षांसाठी सुधारगृहात रवाना करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले .

22 ऑगस्ट 2013 रोजी एका 23 वर्षी फोटोजर्नलिस्टवर 5 जणांनी लोअर परळ येथील शक्ती मिल कंपाऊडमध्ये अमानुष बलात्कार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी सलीम अन्सारी, विजय जाधव, मोहम्मद कासीम हफीज उर्फ कासीम बंगाली, सिराज खानसह आणखी एका अल्पवयीन आरोपींनी अटक केली होती. न्यायालयाने यापूर्वीच कासीम, विजय आणि मोहम्मद या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यातील सिराजसह एकाला आज बाल न्यायालयाने 3 वर्षांसाठी नाशिकच्या सुधारगृहात पाठविण्याचे आदेश दिले आहे.

Leave a Comment