विराटकडे सोपवावे कसोटी संघाचे कर्णधारपद – चॅपेल

ian
बंगळूरु – भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याकडे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात यावे असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

विराटकडे महेंद्रसिंग धोनीऐवजी नेतृ्त्व सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते. धोनी हा कसोटी कर्णधार होऊ शकत नाही. माझ्या मते टी२० आणि एकदिवसीय क्रिकेट संघासाठी तो उत्तम कर्णधार आहे. मला नाही वाटत की हे पद विराटकडे देण्यास काही समस्या आहे, असे चॅपेल म्हणाले.

सध्या कठोर निर्णय घेण्याची भारतीय निवड समितीला गरज आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीकडे ज्याप्रमाणे कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे ती भारतीय निवड समितीमध्ये नाही असेही ते म्हणाले.

कोहलीकडे कसोटी कर्णधारपदाचे नेतृत्व सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे. तो एक आत्मविश्वासू क्रिकेटपटू आहे त्यामुळे कर्णधारपदाचा परिणाम नक्कीच त्याच्या खेळावर होणार नाही असे चॅपेल यांनी सांगितले.

Leave a Comment