प्रतिजैविकांच्या वापरात भारत जगात अव्वल

pills
जगात सर्वाधिक प्रमाणात प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स औषधांचा वापर करण्यात भारत अव्वलस्थानी असल्याचे नव्याने केलेल्या निरीक्षणात स्पष्ट झाले आहे. प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधकांनी – ग्लोबल ट्रेंड इन अॅटीबायोटिक कन्झम्प्शन २०००-२०१० या नावाने ही निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यात जगातील ७१ देशांत प्रतिजैविके वापराचे प्रमाण किती आहे याचा अभ्यास करण्यात आला. भारतानंतर प्रतिजैविकांचा वापर करणार्‍या देशांत चीन आणि युएसचा क्रमांक आहे.

या निरीक्षणातून असे दिसून आले की दहा वर्षांच्या कालावधीत प्रतिजैविकांचा वापर ३६ टक्के वाढला आहे. जगातील प्रतिजैविकांच्या एकूण खपापैकी एक तृतीयांश खप हा भारत, चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या पाच देशांतच होतो. या निरीक्षणात १६ गटांतील प्रतिजैविकांचा आढावा घेतला गेला. त्यात पेनिसिलिन गट, सेफॅलोस्फोरीन आणि फ्लुरोक्विनोलीन प्रतिजैविकांचा वाटा ५५ टक्के आहे असे दिसून आले.

प्रतिजैविकांच्या अतिवापराने हे विषाणू प्रतिजैविकांना दाद देईनासे होतात आणि जगात हा धोका आज फार मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे साध्या आजारांवरही प्रतिजैविके देणे धोकादायक ठरते आहे. भारतासारख्या देशात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही प्रतिजैविके कुणालाही मिळू शकतात आणि त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही असेही दिसून आले.

Leave a Comment