पाण्याचे बिंदू करतील स्मार्टफोन चार्ज - Majha Paper

पाण्याचे बिंदू करतील स्मार्टफोन चार्ज

water
इलेक्ट्रोनिक उपकरणांची व्याप्ती जशी वाढत चालली आहे तशीच ही उपकरणे चार्ज करण्यासाठी विविध पदार्थांचा कसा उपयोग होऊ शकेल यावरचे संशोधनही विस्तृत प्रमाणात केले जात आहे. दुर्गम भागात जेथे वीज उपलब्ध होऊ शकत नाही अशा ठिकाणी ही उपकरणे कशी चार्ज करायची हा मोठाच प्रश्न येतो. आता हवेतील आर्द्रता म्हणजेच पाण्याच्या बिदूंपासून वीज निर्मिती शक्य असल्याचे संशोधनात आढळून आल्यामुळे भविष्यात स्मार्टफोन, आयपॅड या पाण्याच्या थेंबापासून चार्ज होऊ शकतील असे मॅसेच्यूसेट विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.

सुपरहायड्रोफोबिक पृष्ठभागावर जेव्हा पाण्याचे थेंब पडून पुन्हा उडतात तेथे थेंबात इलेक्ट्रीक चार्ज तयार होतो असे संशोधकांना आढळून आले. शिवाय यामुळे स्वच्छ पाणी मिळते हा दुसरा फायदा. स्वस्त अॅल्युमिनियमपासून सपाट प्लेट बनवून त्यावर हा प्रयोग केला तर यासाठी येणारा खर्चही कमी येईल असे संशोधकांचे म्हणणे आहे. वातावरणातील पाण्याचे थेंब हा उर्जा निर्मीतीसाठीचा मोठा स्त्रोत ठरू शकतो असा या संशोधकांचा दावा आहे. पाण्याचे थेंब धातूच्या पृष्ठभागावर पडून कमी प्रमाणात वीज निर्मिती होते ती इलेक्ट्रोनिक उपकरणे चार्ज करण्यासाठी पुरेशी ठरेल असाही त्यांचा दावा आहे. मिजिकोव्हीक आणि इव्हलन वांग या दोघांनी हे संशोधन केले. दुर्गम भागासाठी याचा वापर उपयुक्त ठरू शकणार आहे.

Leave a Comment