मनिला – एक तीन वर्षांची चिमुरडी अत्यंसस्कार सुरु असतानाच जिवंत झाल्याची धक्कादायक घटना फिलिपाईन्समध्ये घडली आहे. हा प्रकार पाहून अत्यंविधीसाठी आलेले सगळेच जण अचंबित झाले.
पहा अत्यंसस्कार सुरु असतानाच मुलगी जिवंत झाली
फिलिपाईन्समध्ये तीन वर्षांच्या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. यांनतर तिच्यावर अंतिम संस्कार सुरु होते. अंतिम संस्काराच्या सर्व विधी पार पडल्यानंतर या मुलीला लगेचच दफन करण्यात येणार होते.
मात्र, त्याचवेळी तिची मान हलल्याचे एकाच्या लक्षात आले. त्याने लगेच ही घटना काही व्यक्तींच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर मुलीच्या हृद्याचे ठोके आणि नाडी तपासण्यात आली. मुलगी जिवंत असल्याचे लक्षात येताच तिला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले.
या प्रकाराचा एक व्हिडिओ प्रत्यक्षदर्शीने युट्युबवर शेअर केला आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांसह अंत्यसंस्कारासाठी आलेल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.