चक्क अर्ध्या सेकंदात जमीनदोस्त केला 55 वर्षे जुना उड्डाणपूल

bridge
वॉशिंग्टन : चक्क अर्ध्या सेकंदाच्या आत अमेरिकेतील आहोया येथील 55 वर्षे जुना उड्डाणपूल विस्फोटक सामग्री लावून जमीनदोस्त करण्यात आला आहे.

१९५९ साली क्लेवलँडमधील याच्या उभारणीसाठी १० मीलियन पौंड स्टील वापरण्यात आले असून हा पूल १२८ फूट उंच, ५०७८ लांबीचा आणि ११६ फूट रूंदीचा होता. हा पूल जमीनदोस्त करण्यासाठी १८२ पौंड विस्फोटक सामग्री वापरण्यात आली. स्थानिक रहिवाशांसह पशू-पक्ष्यांच्या जीवाला या धमाक्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पूलाच्या चारी बाजूंचा परिसर खाली करण्यात आला होता. मात्र, हजारों लोकांनी याचे थेट दृश्य पाहिले. २०१६ पर्यंत येथे नवा उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment