गोडधोड खायला न दिल्याने अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

ajit-pwar
औरंगाबाद : दोन अभियंत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सरबराई करण्यात कुचराई केल्याच्या कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. औरंगाबादेत काल राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा होता. या मेळाव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुभेदारी या विश्रामगृहावर अजित पवार यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र भोजन सुरू असताना या विश्रामगृहाच्या व्यवस्थेची आणि अजित पवार यांच्या भोजनाची जबाबदारी असणारे दोन अभियंते अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दोन अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी गोडधोड मागितले होते अशीही चर्चा आहे. पण ते उपलब्ध नसल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांची गोड खाण्याची तलफ दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे कारण ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान विरोधकांनी या कारवाईबाबत सुरू केली आहे. या प्रकरणामुळे अजितदादा पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment