गेलचे तडाखेबंद शतक; जमैका तलावा विजयी

gayle
सेंट जॉर्ज – सीपीएल टी-20 स्पर्धेत जमैका तलावा संघाने सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या वादळी नाबाद शतकाच्या जोरावर सेंट लुसिया झोक्स संघाचा ७ गडय़ांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना सेंट लुसिया झोक्सने २० षटकांत ५ बाद १६१ धावा जमविल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हीडसने ३८ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५६, कर्णधार सॅमीने २२ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद २९, फ्लेचरने ३३, चार्ल्सने २४ धावा जमविल्या. जमैका संघातर्फे रसेलने २३ धावांत २ गडी बाद केले. त्यानंतर जमैका तलावाने १९ षटकांत ३ बाद १६२ धावा जमविल्या. सलामीच्या गेलने ६३ चेंडूंत १० षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद १११ धावा झोडपल्या. गेलचे हे सीपीएलमधील पहिलेच शतक आहे. गेलने वॉल्टनसमवेत सलामीच्या गडय़ासाठी ३२ धावांची भागीदारी केली. वॉल्टनने १२ चेंडूंत २३ धावा जमविल्या. गेलने ब्लॅकवूडसमवेत दुसऱया गडय़ासाठी ६४ धावांची भर घातली. त्यामध्ये ब्लॅकवूडचा वाटा केवळ ८ धावांचा होता. गेलने व्होगेससमवेत तिसऱया गडय़ासाठी ५५ धावांची भागीदारी केली.

Leave a Comment