गॅस्टीन लेडीज टेनिस स्पर्धेचे पेटकोव्हिकला जेतेपद

andreya
बॅड गॅस्टीन – आंद्रेया पेटकोव्हिकने येथे झालेल्या गॅस्टीन लेडीज टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविले. तिचे हे या वर्षातील दुसरे जेतेपद आहे.

अंतिम फेरीत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सचा जर्मनीच्या या २० व्या मानांकित पेटकोव्हिकने पेंच स्पर्धेनंतर पहिल्याच क्लेकोर्ट स्पर्धेत खेळताना ६-३, ६-३ असा पराभव केला. तिने एप्रिलमध्ये चार्लस्टन स्पर्धा जिंकली होती. तीन वर्षांपूर्वी तिने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानापर्यंत मजल मारली होती. कारकिर्दीत तिने आतापर्यंत चार अजिंक्यपदे मिळविली असून २००९ मध्येही तिने येथील स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे चारही अजिंक्यपदे क्लेकोर्टवरील आहेत. रॉजर्स ही जागतिक क्रमवारीत १४७व्या क्रमांकावर असून यापूर्वी एकाही स्पर्धेत तिने दुसरी फेरी पार केली नव्हती.

Leave a Comment