नॉटिंगहॅम – यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णीत राहिली. इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूकने या बाबत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की या कसोटीत नॉटिंगहॅमची खेळपट्टी यजमान इंग्लंडच्या तुलनेत भारताला अधिक साथ देत होती.
खेळपट्टी इंग्लंडच्या तुलनेत भारताला अधिक साथ देत होती – कूक
भारतातील नागपूरच्या खेळपट्टीशी नॉटिंगहॅमच्या खेळपट्टीची तुलना कूकने केली आहे. इंग्लंडचा संघ २०१२ साली भारताच्या दौऱयावर आला होता. या दौऱयात नागपूरच्या कसोटीत आम्ही चार वेगवान गोलंदाजांना खेळविले तथापि, त्याचा फारसा फायदा आम्हाला होऊ शकला नाही, असेही कूक म्हणाला. या सामन्यात इंग्लंडच्या जेम्स ऍन्डरसनला `सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. ऍन्डरसनने या कसोटीत आपले पहिले अर्धशतक झळकविताना ८१ धावा फटकाविल्या तसेच रूट समवेत त्याने शेवटच्या गडय़ासाठी १९८ धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली. कूकने रूट आणि ऍन्डरसन यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.