एक गाव असे ,कुठेही फिरा…दर्शन जुळ्या मुलांचेच !

twins
केरळच्या कोदिन्ही गावात गल्लोगल्लीत जुळी मुले जन्मास येतात. आपल्या लौकिकामुळे जुळ्यांचे गाव अशीच त्याची ओळख बनली आहे. तिथे थोडेथोडके नव्हे तर तब्बल २२0 जुळे आहेत. तेही अवघ्या दोन हजार कुटुंबांमध्ये. आश्‍चर्य ठरलेले हे गाव डॉक्टरांसाठी संशोधनाचा विषय बनले आहे. जगात जुळे जन्मास येण्याच्या सरासरीपेक्षा सहापटीने जास्त जुळे इथे जन्मास येतात. हे आजकाल होत नाही तर गेल्या तीन पिढय़ा म्हणजे ६0-७0 वर्षांपासून हा सिलसिला सुरू आहे. त्यामागचे कारण बहुधा इथल्या लोकांच्या आहारात आहे. यास अनुवांशिकता मानण्यास मात्र शास्त्रज्ञ तयार नाहीत. तज्ज्ञांच्या मते, या गावात जन्मलेल्या एक हजार मुलांमध्ये जुळ्यांची संख्या ४५ एवढी आहे. दुसरीकडे आशियाई लोकांमध्ये जुळे होण्याची सरासरी अवघी चार आहे. म्हणूनच या गावातील हा सरासरी एखाद्या आर्श्‍चयापेक्षा कमी नाही. जुळी मुले बहुतेकदा सारख्या चेहरेपट्टीची असतात. त्याचा ते अनेकदा फायदा उचलतात.

शाळेत शिक्षकांचा त्यांच्यामुळे नेहमीच गोंधळ उडतो. ही मुलेही एकमेकांच्या वर्गात जाऊन बसतात वा एकमेकांची परीक्षा देतात. काही लोकांच्या मते, या गावात जुळे जन्मास येण्याची घटना चमत्कारासारखीच आहे. जास्त जुळे होण्यामागे जी कारणे असतात तीही इथे आढळून येत नाहीत. साधारणपणे अधिक वयाच्या महिलांना जुळे होते, पण या गावात १८-२0 वर्षांच्या महिलाही जुळे जन्मास घालतात. आणखी एक म्हणजे जुळे जन्मास घालणार्‍या महिलेची सरासरी उंची ५ फूट ३ इंचाहून जास्त असते. इथे मात्र महिलांची सरासरी उंची पाच फुटांच्या आसपासच आहे.

Leave a Comment