आयकर विभागाचा इशारा; फसव्या ई-मेल पासून राहा सावध

income-tax
नवी दिल्ली : तुमच्या कर भरण्यासंदर्भात किंवा थकबाकी संदर्भात तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून एखादा मेल आला असेल तर तो एकदा पडताळून नक्की पाहा. कारण, कर दात्यांना फसवणूक करणाऱ्या ई-मेलपासून सावधान राहण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केले आहे. असे ई-मेल मिळाल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून आल्यानंतर अर्थ मंत्रालयाने हा संदेश जाहीर केला आहे.

अशाप्रकाचे काही ई-मेल्स करदात्यांना आयकर विभागाकडून मिळत आहेत, अशा सूचना मिळाल्या आहेत. ज्यामध्ये योग्य मिळकतीसंबंधीत फाईल डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जात असून, हा मेल [email protected] या ई-मेल आयडीकडून पाठवण्यात येतो आहे.
परंतु, आयकर विभागाकडून किंवा अर्थ मंत्रालयाकडून अशा प्रकारचा कोणताही मेल कुणाच्याही ई-मेलवर पाठवण्यात आलेला नाही, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा प्रकारचा ई-मेल कुणालाही आल्यास त्यांनी त्यामध्ये असलेली फाईल डाऊनलोड करू नये, कारण त्यामध्ये वायरसही असू शकतो, अशी सूचनाही मंत्रालयाने केली आहे. तसेच या ई-मेलबाबत तत्काळ आयकर विभागाच्या राष्ट्रीय वेबसाईट www.incometaxindia.gov.in वर रिपोर्ट फिशिंग बटन दाबून याची तक्रारी नोंदवा.

Leave a Comment