काबूल : अफगाणिस्तानातील पकटिका भागातील एका बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात ४० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट; 40 ठार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका संशयित व्यक्तीचा स्थानिक पोलीस पाठलाग करीत असताना त्या व्यक्तीने भर बाजारात आपली मोटार नेली. या वेळी बाजारात रमजानच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी वर्दळ होती. संशयित व्यक्तीने मोटारीत आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला. यामध्ये ४० नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. पकटिका हा भाग पाकिस्तानी सीमेलगत असून, या भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.