सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव !

solapur
पुणे : पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिल्यानंतर सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास राज्य सरकार मंजुरी देणार असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठास दिल्यानंतर, आता सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ लवकरच मंजुरी देणार आहे. दहावीनंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यंदा दहावीचा निकाल उत्तमरीत्या जाहीर झाल्यामुळे प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना जटील होत आहे. त्यासाठी अनुदानित तुकड्या आणि तुकड्या वाढवू देणे याबाबत शालेय शिक्षणमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन बुधवारी याबाबतचा ठोस निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. राज्यात सध्या लोकसेवा आयोगाच्या साडेसहा हजार पदे रिक्त आहेत. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेमध्ये त्रुटी असल्यास सदस्य मंडळाने ती दाखविल्यास राज्य मंत्रिमंडळात त्यावर निर्णय निश्‍चित घेऊ, अशी ग्वाही ठामपणे पाटील यांनी यावेळी दिली.

Leave a Comment