सीताफळ उत्पादनात यंदा घट

sitafal
पुणे – यंदा दुष्काळाच्या झळा सीताफळास जाणवल्याने उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५0 टक्क्यांनी घट झाली आहे.

यंदा शेतकर्‍यांनी उन्हाळ्यात सीताफळाच्या झाडांना टॅंकरने पाणी पुरवठा केला मात्र जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. झाडांना फळधारणा चांगली झाली असून प्रत्येक झाडास १५0 नग इतकी फळधारणा झाली आहे. मात्र या फळांचा आकार लहान आहे. त्यामध्ये गराचे प्रमाणही कमी आहे.

सध्या बाजारात आवक होणार्‍या मालापैकी ७५ टक्के माल हलक्या प्रतिचा आहे. तर बाजारात उच्चप्रतिचा माल अवघा दहा ते पंधरा टक्के इतका आहे. उच्च दर्जाच्या मालास प्रतिकिलोस ७0 ते १00 रुपये इतका तर दुय्यम दर्जाच्या मालास १0 ते ५0 रुपये प्रतिकिलोस भाव मिळत आहे . गेल्या आठवड्यात उच्च प्रतिच्या सीताफळास १७१ रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला होता. मात्र आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली आहे.

Leave a Comment