संसद सभापती पदासाठी सुन्नींनी निवडला उमेदवार

iraq2
बगदाद – संसदेच्या सभापती पदासाठी एका उमेदवाराची इराकच्या सुन्नी अरब राजकीय नेत्यांनी निवड केली आहे. या पावलामुळे एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सरकार बनविण्यासाठीचे प्रयत्न पुनर्जीवित होऊ शकतात असे मानले जात आहे. तर दुसरीकडे बंदूकधाऱयांनी बगदादच्या एका निवासी परिसराच्या दोन इमारतींमध्ये घुसत २९ महिलांसमवेत कमीतकमी ३३ लोकांना ठार मारले आहे.

बंदूकधारी पूर्व बगदाद नजीकच्या जयौनाहच्या इमारतींमध्ये घुसले होते. त्या दरम्यान १८ लोक जखमी झाले होते. पोलीस अधिकाऱयांनी या भागाची घेराबंदी केल्याचे म्हटले आहे. गृह मंत्रालयाचा एक अधिकारी आणि रुग्णालयाच्या अधिकाऱयांनी बळींच्या संख्येची पुष्टी केली आहे. एवढय़ा लोकांना मारण्याचा उद्देश मात्र स्पष्ट झालेला नाही.

संयुक्त राष्ट्राने इराकच्या राजकीय नेत्यांनी आपले मतभेद बाजूला करत तत्काळ एक सरकार बनवावे अन्यथा स्थिती आणखी बिघडू शकते असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर संसद सदस्यांनी संसद अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी सभापती तसेच राष्ट्रपती आणि पंतप्रधान सारख्या महत्त्वपूर्ण पदांबाबत निर्णय घेतला जाण्याची चर्चा होती. नवे नेतृत्व हिंसेवर अंकुश आणू शकेल अशी आशा केली जात आहे.

निवडणूक झाली ज्यात डॉक्टर सलीम अल जबूरी यांनी खासदारांचा विश्वास संपादन केला आहे. संसद सभापती पदासाठी सून्नी समूहाचा उमेदवार म्हणून त्याच्या नावावर पुष्टी झाल्याचे संसदेचा सुन्नी समूह `यूनायटेड फॉर चेंज’ने म्हटले आहे. परंपरेनुसार संसदेचे प्रमुख पद इराकच्या अल्पसंख्याक सुन्नींना, राष्ट्रपती पद कुर्दांना आणि पंतप्रधानपद इराकच्या बहुसंख्याक शियांना दिले जाते.

Leave a Comment