शत्रूचा पाठलाग करून वेध घेणारी बुलेट

bullet
वॉशिग्टन – अमेरिकेच्या सुरक्षा संशोधन एजन्सीने शत्रूचा पाठलाग करून त्याला अचूक टिपणारी बंदुकीची गोळी तयार केली आहे. डार्पा या संस्थेने विकसित केलेल्या या गोळीला एक्स्ट्रीम अॅक्युरसी ऑर्डनन्स या नावाने संबोधले जात आहे. ही गोळी ०.५० कॅलीबरची असून स्नायपर बंदुकांत चिचा वापर करता येणार आहे.

गोळी झाडताना बंदूक चालविणार्‍याने साधलेला अँगल, हवेतील आर्द्रता, दाब यांचा अचूक मेळ जमावा लागतो. मात्र या गोळीसाठी ते आवश्यक नाही. नेम अचूक नसला तरीही गोळी निशाणा अचूक साधते असा संशोधकांचा दावा आहे. या गोळीच्या चाचण्या घेतल्या गेल्या असून त्यात १० पैकी ९ वेळा गोळीने अचूक निशाणा साधला असल्याचेही समजते. या प्रकल्पासाठी १५० कोटी रूपये खर्च केले गेले आहेत आणि २००८ पासून ही गोळी विकसित केली जात आहे. सध्या या गोळीने ६०० मीटरवरचा निशाणा अचूक साधला असला तरी लवकरच ती २ किमी पर्यंतचा अचूक वेध घेऊ शकेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या गोळीसाठी ऑप्टीकल साईटिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. तसेच त्याला रियल टाईम गायडन्स सिस्टीमही दिली गेली आहे. यामुळे गोळी झाडणारा आपला निशाणा प्रत्यक्ष पाहू शकतो. त्यानुसार दिशा ठरवून गोळी डागली की ती शत्रूचा पाठलाग करून अचूक वेध घेते. दिशा ठरविण्यासाठी स्मार्टफोन अथवा संगणकाची मदत घेतली जाते.

Leave a Comment