भारतीय इंजिनीअरने बनवली सौर उर्जेवर चालणारी रिक्षा

navin
बंगळूरू – इंजिनिअर असलेल्या नवीन राबेल्ली यांनी गेली दोन वर्षे सेकंड हँड टूकटूक विजेवर आणि सौरउर्जेवर कशी चालेल यासाठी खर्ची घालत तीन चाकी टूकटूक तयार केली आहे. पर्यावरणाला हानी न पोहचवता प्रवास करण्याची संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी ते पुढच्या वर्षी दहा देशांमध्ये ९६०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

पहिल्यांदा टूकटूक राबेल्ली यांनी गॅरेजमधून बाहेर काढली तेव्हा ती बंद पडली होती. पण या अपयशाने न खचता त्यांनी पुन्हा एकदा त्यात आवश्यक ते बदल करत आपले स्वप्न पूर्णत्वास नेले. आता या टूकटूकमधूनच ते लंडन गाठणार आहेत.

या तीन चाकीला त्यांनी ‘तेजस’ असे नाव दिले आहे आणि त्यात नवी मोटर, बॅटरी आणि गिअरबॉक्स बसवण्यात आला आहे. सर्वसाधारण अॅटोरिक्षाच्या वजनाच्या तुलनेत ही तीन चाकी दुप्पट वजनाची आहे. या गाडीच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत आणि कापडाचे पदडे आत बसणाऱ्या प्रवाशांचे उन्हापासून संरक्षण करतात.

राबेल्ली यांनी आपली आयुष्यभराची पूंजी यात खर्च केली आहे. या गाडीच्या निर्मितीसाठी त्यांना ३६००० रुपये खर्च आला. आता त्यांना खराब झालेले प्लोरिंग तसंच जुन्या बॅटरीच्या जागी नवी लिथियम आयर्न बॅटरी बसवण्यासाठी अधिक रकमेची गरज आहे. पण राबेल्ली यांच्या मते अॅटोरिक्षाच्या तुलनेत ही गाडी अधिक किफायतशीर असून अवघ्या ६०-७० रुपयात ती १०० किमीचे अंतर कापते. तर डिझेलवर चालणाऱ्या टूकटूकला तेवढंच अंतर कापण्यासाठी २५०-२७५ रुपये खर्च येतो.

राबेल्ली यांची बंगलोर ते मुंबई असा प्रवास करण्याची आणि त्यानंतर बोटीने इराणला जाण्याची योजना आहे. इराणमधून टर्कीमोगे बलगेरिया आणि मग यूरोपमध्ये प्रवास करण्यासाठी फ्रान्समधील कालाई बंदरामार्गे जाण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. या प्रवासात त्यांचे जोडीदार राओल कोपॅका हे टूकटूकच्या मागच्या बाजूस सतरंजीवर ताणून देणार आहेत. कोपॅका यांना या प्रवासावर आधारीत डॉक्यूमेंटरी बनवायची असल्याने आपण त्यांची निवड केली असल्याचे राबेल्ली यांनी सांगितले.

Leave a Comment