जनतेची इच्छा असल्यास कराडमधून लढणार- पृथ्वीराज चव्हाण

chavan
कराड – जनतेची इच्छा असेल तर दक्षिण कराडच्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणक लढविणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते म्हणाले की मी निवडणूक लढविण्यास उत्सुक असलो तरी अंतिम निर्णय केंद्रीय निवड समिती घेईल. अर्थात यातून चव्हाण यांनी आपण राज्यातच राहणार असल्याचेही सूचित केले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे सांगून ते म्हणाले की या निवडणुका राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रच लढविणार आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.उमेदवार निवडीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. चव्हाण म्हणाले की विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कार्यकर्त्यांबरोबरच्या बैठका झाल्या आहेत. कोकणात लवकरच बैठका होतील.

लोकसभा निवडणुकात आम्ही सोशल मिडीयाच्या वापरात मागे पडलो याची कबूली देताना चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकांत मात्र ही कमतरता भरून काढली जाईल असे सांगितले. या निवडणूक प्रचारात आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेणार आहोत हेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment