गाझापट्टीत अजूनही धुमश्चक्री सुरूच, १७२ जणांचा बळी

gaja
जेरुसलेम – गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेली इस्रायलने सुरु केलेली धुमश्चक्री थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज इस्रायलने गाझापट्टीतील आपली कारवाई अधिक तीव्र केली असून आतापर्यंत या धुमश्चक्रीत १७५ जण ठार तर १२५० जण जखमी झाले आहेत.

संयुक्त राष्ट्रांनी चालवलेल्या शिबिरात बैत लाहिया विभागातील १७ हजार नागरिकांनी आश्रय घेतला होता. मात्र, इस्त्रायलने दिलेल्या इशा-यानंतर त्यांनी शिबिरातून पळ काढला आहे.

इस्रायलची लढाऊ विमाने अनेक मोकळ्या जागा, घर आणि गटांवर बॉम्ब टाकत आहेत. इस्रायली नौदलाच्या युद्धनौकाही क्षेपणास्त्राने हल्ले करीत आहेत.
‘हमास’ च्या दहशतवाद्यांकडून इस्रायलच्या शहरांवर सातत्याने रॉकेटचा मारा केला जात आहे. मात्र, या हल्ल्यात कोणीही इस्रायली नागरिक ठार झालेला नाही.

इस्रायली लष्कराने सांगितले की, इस्रायलच्या किनारपट्टी भागात फिरणारे ‘हमास’ ड्रोन पाडण्यात आले आहे. इस्रालयचे कमांडो व पायदळाला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर हमासच्या लष्करी शाखेने सांगितले की, इस्रायलची माहिती काढण्यासाठी अनेक ड्रोन विमाने पाठवली आहेत.

Leave a Comment