कसोटी क्रिकेटमधून महेला जयवर्धनेची निवृत्ती

mahela
कोलंबो – कसोटी क्रिकेटमधून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या विरुद्ध होणा-या कसोटी सामन्यानंतर तो निवृत्त होणार आहे.

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांना पत्राद्वारे महेलाने ही माहिती दिली. निवृत्तीचा निर्णय़ माझ्यासाठी सोपा नव्हता. गेल्या १८ वर्षांपासून मी माझ्या देशासाठी खेळत आहे ही खरचं माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र मला विश्वास आहे की निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. असे जयवर्धने म्हणाला.

जयवर्धने निवृत्ती घेण्याआधी येत्या १६ आणि २४ जुलैला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात खेळणार आहे तर ऑगस्टमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यात तो खेळणार आहे.

जयवर्धनेने १९९७ मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत १४५ सामन्यांमध्ये ११ हजार ४९३ धावा केल्या आहेत. यामध्ये ३३ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे.

Leave a Comment