
नोमपेन्ह – सैनिकांच्या अभ्यास दौऱयादरम्यान कंबोडियन लष्कराचे हॅलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले असून, या दुर्घटनेत पाच सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कंबोडियन लष्कराच्या हॅलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; पाच ठार
कंबोडियन लष्कराच्या सैनिकांसाठी अभ्यास दौऱयाचे आयोजन करण्यात आले होते. कंबोडियाची राजधानी नोमपेन्हेच्या जवळ अभ्यास दौऱयादरम्यान हॅलिकॉप्टरला अपघात झाला. त्यात हॅलिकॉप्टरमधील पाच सैनिकांचा मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती कंबोडियाचे संरक्षणमंत्री टी. बन्ह यांनी दिली. अपघाताच्या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचे बन्ह यांनी सांगितले.
