एलजीचा अनोखा ‘फ्लेग्झिबल टीव्ही’

flexible
मुंबई – इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या एल.जी.कंपनीने अनोखा टेलिव्हिजन तयार केला या या टीव्हींला आपण एखाद्या कागदाप्रमाणे फोल्ड करु शकतो. दोन स्लीम टेलिव्हिजन स्क्रीन एलजीने लाँच केले आहेत.

या टीव्ही स्क्रीन इतके लवचिक आहेत की यांची तीन सेंटीमीटरच्या गोल आकारात गुंडाळी करता येऊ शकते. अशा अनोख्या बनावटीमुळे आता टीव्हीचा नव्या पद्धतीने वापर करणे शक्य होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या नव्या टीव्हीच्या स्क्रीनचे रिझोल्यूशन 1200*810 असून ही टीव्ही स्क्रीन गुंडाळल्यानंतरही त्यातील प्रतिमा बिघडत नाही.

एलजीने या नव्या टीव्हीपाठोपाठ २०१७ पर्यंत असा ६ इंचांपर्यंतचा गुंडाळता येणारा टीव्ही निर्माण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. स्टफ टीव्हीचे संपादक स्टीफन ग्रेव्ह्स यांच्या म्हणण्यानुसार, गुंडाळता येणाऱे स्क्रीन हे एक उत्तम तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे येत्या काळात नव्या शक्यता उपलब्ध होणार आहेत.

हे स्क्रीन परंपरागत स्क्रीनच्या तुलनेत अधिक टिकाऊ असतील. त्यामुळे आता विमान तसेच इतर अनेक ठिकाणी मोठ्या आणि अधिक चांगल्या स्क्रीनची अपेक्षा आपण करु शकतो असेही एलजी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. २०१४ च्या सुरवातीला एका इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड शोमध्ये एलजीने अशा लवचकी टीव्हीची घोषणा पहिल्यांदा केली होती. त्यानंतर आता त्यांची ही घोषणा प्रत्यक्षात उतरली आहे. त्यामुळे ही कर्व्ह टीव्ही पाठोपाठ आता फोल्ड टीव्ही देखील उपलब्ध झाल्यानं इडीएड बॉक्स म्हणून हिणवल्या जाणाऱ्या टेलिव्हिजननं चांगलीच प्रगती केल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Comment