
मुंबई – इराकमधील ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेत महाराष्ट्रातल्या कल्याणमधून धार्मिक यात्रेसाठी आखाती देशात गेलेले चार तरूण सामिल झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘आयएसआएस’ मध्ये चार भारतीय तरुणांचा सहभाग
एका वर्तमान पत्राने प्रसिध्द केलेल्या वृत्तानूसार, महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले आरीफ माजीद, फहाद शेख, अमन तांडेल आणि शाहीन टंकी हे चार तरूण धार्मिक यात्रेसाठी आखाती देशात गेले होते. या यात्रेत एकुण २२ जण सहभागी झाले होते. आपण ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेत सामिल झालो असल्याची माहिती कल्याण मधील चार जणांपैकी आरीफ याने आपल्या कुटूंबियांना पत्र पाठवून कळविली आहे. त्यामुळे कुटूंबियांची चिंता वाढली आहे. या कुटूंबियांनी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली असून, भेटीची वेळ मागितली आहे.
