अखेर जर्मनीने हस्तगत केला फूटबॉल वर्ल्डकप

fifa
रिओ द जनेरो- ब्राझीलमध्ये खेळल्या गेलेल्या आणि शेवटपर्यंत अटीतटीच्या झालेल्या फूटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत विजयी गोल मारून जर्मनीने आपले नांव जगज्जेते म्हणून कोरले. विशेष म्हणजे या सामन्यातही सबस्टीट्यूट म्हणून आलेल्या मारियो गोट्झानेच विजयी गोल मारण्याची अभूतपूर्व कामगिरी बजावली आणि २४ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर चषक जर्मनीला मिळाला.

दोन वेळा जादा वेळ द्यावा लागलेल्या या चुरशीच्या सामन्यात ११३ व्या मिनिटाला सबस्टीट्यूट फुटबॉलर आंद्रे शर्लकडून आलेला पास अचूक साधत सबस्टिट्यूट मारियोने अर्जेंटिनाच्या गोल किपरला चकवत चेंडू गोलमध्ये मारला आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष उसळला. अर्जेंटिनाच्या समर्थकांचे डोळे दुःखाने पाझरू लागले तर जर्मनीच्या समर्थकांच्या डोळ्यात आनंदाश्रुनी गर्दी केली. विशेष म्हणजे प्रथमच अमेरिकेच्या भूमीवर युरोपियन टीम फूटबॉलची जगज्जेती ठरली. या यशासाठी जर्मनीने तब्बल २४ वर्षे प्रतीक्षा केली.

अर्जेटिनाचा गोलकिपर साजिओ रोमेरोन याने जर्मनीचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न नाकामयाब ठरविले. अंतिम सामन्यात मेसीची जादूही दिसली नाही. मात्र जर्मनीचे कोच जो किम यांनी मारियोला दिलेला गुरूमंत्र त्याने तंतोतंत पाळला आणि गोल्डन गोल करून अर्जेंटिनाला पराभवाची चव चाखविली.

Leave a Comment